काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख ह्यांची हकालपट्टी

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्षश्रेष्ठींनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी देशमुख यांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने पाच मार्चला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीला देशमुख यांनी ९ एप्रिलला उत्तर पाठवले होते. हे उत्तर समाधानकारक नसल्याचे समितीने म्हटले आहे.

आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्यांची दखल घेत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल आपले प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निष्कासीत करण्यात येत आहे, असे चव्हाण यांनी या पत्रात म्हटले आहे.

Published by Cinpra Free Souls Foundation

Director

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started